2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेले आश्वासन आता पूर्ण झाले आहे. आज गुरुवारी (12 डिसेंबर) केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे.
केजरीवाल यांच्या घोषणेपूर्वी सकाळी दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली, त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात याची घोषणा केली.
केजरीवाल यांच्या घोषणेनंतर सरकार या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये हस्तांतरित करणार आहे. एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीनंतर महिलांना 1000 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली.13 डिसेंबर पासून महिला या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.