Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपेतून उठवले म्हणून 17 वर्षीय मुलाने रागात धक्काबुकी केल्याने आईचा मृत्यू

झोपेतून उठवले म्हणून 17 वर्षीय मुलाने रागात धक्काबुकी केल्याने आईचा मृत्यू
, शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (15:05 IST)
Gorakhpur News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईचा जीव घेतल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. या मुलाची आई त्याला सकाळी शाळेत जायला उठवत होती. पण या मुलाला उठायचे न्हवते त्यामुळे हा मुलगा आईला रागाच्या भरात धक्कबुक्की करीत होता. यामुळे या महिलेचे डोके भिंतीवर आदळले. व तिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
आईच्या मृत्यूनंतर या मुलाने घराचा दरवाजा बंद केला. अनेक दिवस तो आईच्या मृतदेहासोबत घरातच होता. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि दुर्गंधी पसरल्यानंतर त्याने अगरबत्ती जाळून दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या दिवशी तो घरातून बाहेर पडल्यावर जवळच्या मंदिरात जाऊन बसला. तसेच चेन्नईतील भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चे शास्त्रज्ञ मृत महिलेचे पती राम मिलन यांनी आपल्या पत्नीला अनेक वेळा फोन केला पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्या वहिनी ग्यांती देवी यांना घरी जाऊन तपासणी करण्यास सांगितले. ग्यांती घरी पोहोचली तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि घरातून उग्र वास येत होता. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी दरवाजा तोडून महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह बाहेर काढला.
 
सुरुवातीला या आरोपी मुलाने आपल्या आईचा अपघाती पडल्याने मृत्यू झाल्याचे खोटे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि रक्ताचे डाग तपासले ज्यामुळे या घटनेत बाहेरील व्यक्तीचा सहभाग नसल्याचे सिद्ध झाले. चौकशीदरम्यान, मुलाने सत्य कबूल केले की रागाच्या भरात त्याने आईला धक्काबुक्की केली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. गोरखपूरमध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली असून राग आणि भांडणातून एवढी भीषण दुर्घटना घडलीच कशी असा मोठा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे.  

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई भारताचे फिनटेक हब बनेल, देवेंद्र फडणवीस म्हणाले