Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! पोटच्या गोळ्याला डॉ ला एक लाखात विकले ,डॉच्या बेकायदेशीर बालक आश्रमातून 71 मुलांची सुटका

धक्कादायक! पोटच्या गोळ्याला डॉ ला एक लाखात विकले ,डॉच्या बेकायदेशीर बालक आश्रमातून 71 मुलांची सुटका
, शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (10:57 IST)
एका दांपत्याने आपल्या 5 दिवसाच्या बाळाला कल्याण येथील डॉ. केतन सोनी यांना एक लाखाला विकले. मात्र आपले बाळ परत मागण्यासाठी ते दांपत्य दोन दिवसाने डॉ. सोनी कडे गेले. डॉ ने बाळाला देण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ बेकायदेशीर बालक आश्रम नंददीप मध्ये चालवत असल्याची माहिती महिला बालविकास विभाग आणि  पोलिसांना मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळतातच डॉ सोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी तपास केल्यावर डॉ सोनी बेकायदेशीर बालक आश्रम चालवत होते . पोलिसांनी या आश्रमात धाड टाकल्यावर या आश्रमातून तब्बल 71 मुलांची सुटका करण्यात आली. या संस्थेपासून काहीच अंतरावर असलेल्या एका इमारतीत 2 ते 13वर्षातील वयोगटाच्या मुलांना डांबून ठेवले होते. ते सर्व आजारी होते. त्यांना शासकीय बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे .
 
प्रकरण असे आहे -
डोंबिवलीत राहणाऱ्या एका जोडप्याने कल्याण येथील डॉ. केतन सोनी यांना आपले 5 दिवसाचे बाळ 1 लाखात विकले. या दाम्पत्याला एक आठ वर्षाचा मुलगा आहे.हा मुलगा सोनी यांच्या आश्रमात नंदादीप येथे राहतो. हे दाम्पत्य वर्ष भरापासून डॉ. सोनीच्या संपर्कात होते. दोन दिवसानंतर हे जोडपे आपले बाळ घेण्यासाठी  डॉ कडे गेले. डॉ ने चक्क बाळाला देण्यास नकार दिल्यावर दाम्पत्याने हा सर्व प्रकार डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बाल विकास संरक्षण विभागाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसानी तपास केल्यावर बेकायदेशीर बालक आश्रम चालत असल्याचा प्रकार उघडकीस आला.  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजारांची मदत