मुंबईतील एका रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील रुग्णांच्या रिपोर्ट्सवरून बनवलेल्या पेपर प्लेटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे प्रकरण मुंबईतील केईएम रुग्णालयातील आहे. येथील रुग्णांच्या रिपोर्ट्सवरून बनवलेल्या पेपर प्लेटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयातील रुग्ण कागदी प्लेट्स म्हणून वापरल्या जात असल्याच्या बातम्या आल्या आहेत
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रुग्णालयातील 6 कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बीएमसीने घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमली आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा व्हिडीओ शेअर करत रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला.
यावर प्रतिक्रिया देत रुग्णालयाच्या डीन ने सांगितले हे रुग्णांचे रिपोर्ट नसून सिटी स्कॅन चे जुने फोल्डर आहे.हे फोल्डर भंगार विक्रेत्यांना पुन्हा वापरण्यासाठी दिले होते. मात्र आमचे चुकले कीआम्ही ते फोल्डर फाडून तुकडे करून दिले नाही.
या प्रकरणी बीएमसी आयुक्तांनी एक सदस्यीय समिती नेमली असून प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले असून पालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या डीन कडून स्पष्टीकरण मागवले आहे.