Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! पत्नी बोलत नसल्याने पतीने रागाच्या भरात येऊन पत्नीचा खून केला

धक्कादायक! पत्नी बोलत नसल्याने पतीने रागाच्या भरात येऊन पत्नीचा खून केला
, शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (14:55 IST)
नवरा बायको मध्ये भांडण होणं  साहजिक आहे. जिथे विचार जुळत नाही तिथे मतभेद तर होतातच. आणि हे भांडण विकोपाला गेल्यावर घटस्फोट होण्याचे प्रकरण देखील दिसतात. पण  चेंबूर मध्ये नवरा बायकोत घटस्फोट झाल्यावर बायको पतीशी बोलत नसल्याचा राग पतीला आला आणि त्याने तिचे चाकूने वार करत खून केले. ही धक्कादायक घटना 10 तारखे रोजी चेंबूर येथे घडली आहे. आकांक्षा खरटमोल (21) असे या मयत महिलेचे नाव आहे. चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती अक्षय आठवले(25) याला अटक केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील अशोकनगर येथे राहणाऱ्या आकांक्षा हिचा प्रेम विवाह अक्षय शी डिसेंबर 2019 मध्ये झाला. लग्नानंतर अक्षय आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडत नव्हता. तो काहीच काम करत नसल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे नंतर दोघांचे घटस्फोट झाले. त्यानंतर आकांक्षा आपल्या माहेरी राहू लागली. ती एका रुग्णालयात काम करत होती. दररोज प्रमाणे ती कामाला जात असताना ती रिक्षात बसली .तिचा पाठलाग अक्षय करत होता. तिने आपली दुचाकी रिक्षापुढे अडवली आणि तू माझ्याशी बोलत का नाही. असे विचारून सुद्धा आकांक्षा हिने काहीच उत्तर दिले नाही. तर आरोपीने तिला रिक्षातून ओढून बाहेर काढून तिच्या वर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिच्या डोक्याला , हातावर ,तोंडावर जखमा झाल्या. ती जागीच कोसळली .तिच्या भावाने तिला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अक्षयला अटक केली असून प्रकरणाचा तपास करत  आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या देशातील लोक आपल्या मुलांना घरी हेल्मेट घालतात, हे कारण आहे