Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai दिवाळीत राज्याला हाय अलर्ट

Mumbai दिवाळीत राज्याला हाय अलर्ट
मुंबई , शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (17:02 IST)
दिवाळीपूर्वी मुंबई हादरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली. त्याने पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल केला आणि सांगितले की मुंबई महानगरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब बसवण्यात आले आहेत. ही धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आणि बंदोबस्त वाढवला.
 
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 1 नोव्हेबंर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिस त्यांच्यावर कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
 
पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक काढता येणार नाही. कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्य आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.
 
याआधी 23 सप्टेंबरलाही मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारे फोन आले होते. सांताक्रूझ परिसरातील अनेकांना फोन करून धमकावण्यात आले. त्यानंतरही मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, चायनीज मिळत नसल्याने टोळक्याकडून कोयत्याने तरुणावर हल्ला