नासिर मोहम्मद या ३९ वर्षीय येमेनी नागरिकाला १८ महिन्यांपूर्वी दोन्ही पायात अनेक गोळ्या लागल्या होत्या. त्याचा उजवा पाय अनेक ठिकाणी तुटला होता आणि गोळ्यांनी त्याचे बहुतेक स्नायू निकामी केले होते. 12 शस्त्रक्रियांनंतर त्याला इजिप्तमधील रुग्ण संस्थेमध्ये हलवण्यात आले आणि त्याच्या उजव्या पायावर एक बाह्य फिक्सेटर बसवण्यात आला होता. तरीही तो चालण्यास सक्षम नव्हता आणि त्याला तीव्र वेदना होत होत्या. त्याच्या उजव्या पायाचे चारही फ्रॅक्चर वर्षभरानंतरही बरे झाले नव्हते. त्याच्या डाव्या गुडघ्यालाही अनेक गोळ्या लागल्या होत्या. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, गोळ्या काढण्यात आल्या पण गुडघ्याचे स्नायू एवढ्या प्रमाणात नष्ट झाले की तो गुडघा अजिबात वाकवू शकत नव्हता.
ग्लोबल हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअरवर आला होता, 18 महिन्यांपासून तो अजिबात चालला नव्हता. डॉक्टरांना त्याच्या पायाची अवस्था पाहून पाय पूर्ववत होईल असे वाटत नव्हते, परंतु रुग्णाला त्याचे पाय जपायचे होते. परंतु यामध्ये उच्च धोका असल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले, तसेच अपंगत्व येऊ शकते याचा इशारा दिला. परंतु रुग्णाने कोणत्याही परिस्थिती मध्ये पाय पूर्ववत करण्यासाठी सर्जरीला संमती दिली.
निदान: ग्लोबल हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी नासिर (रुग्ण) यांच्या 12 शस्त्रक्रिया झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे वजन खूप कमी झाले होते. डॉक्टरांनी त्याच्या उजव्या पायाच्या सभोवतालचा पिंजरा काढून टाकला आणि पहिल्या उपचारात त्याचा डावा गुडघा उघडून साफ केला. त्यानंतर, त्यांनी त्याच्या उजव्या पायाचे सर्व फ्रॅक्चर रॉडने बरे केले. 6 आठवड्यांनंतर त्यांनी त्याचा डावा गुडघा बदलला. पण इथे अवघड गोष्ट अशी होती की त्याच्या उजव्या पायात 4 हाडे तुटलेली होती आणि 4 ऐवजी एक रक्तवाहिनी चालू होती, त्यामुळे उजव्या पायाची पूर्ण पुनर्रचना करावी लागली. आणि डाव्या पायाला गुडघ्याला वळवण्याची समस्या होती, त्यामुळे तो बसू शकत नव्हता. नंतर डॉक्टरांनी उजवा पाय ठीक करण्यास सुरुवात केली, प्रथम सर्व फ्रॅक्चर फिक्स करण्यात आले आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नंतर डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि कृत्रिम गुडघा बसवण्यात आला जेणेकरून तो व्यवस्थित वाकला जाईल. दोन्ही शस्त्रक्रिया करताना खूप मोठी जोखीम होती.
निष्कर्ष: रुग्णाच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे, ग्लोबल हॉस्पिटल परळचे डॉक्टर उच्च जोखमीची शस्त्रक्रिया करू शकले आणि ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट डॉक्टरांच्या टीमच्या मध्यस्थीने चांगली परिणामकारक आणि वेळेवर आधारभूत काळजी घेऊन शस्त्रक्रिया यशस्वी झाली.