महाराष्ट्रातील ठाण्यात एका 36 वर्षीय महिलेची 22.67 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या फेसबुक मित्राने ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये फसवणूक झालेल्या महिलेला एका व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. यानंतर दोघांमध्ये नियमित गप्पा सुरू झाल्या. पोलिसांनी सांगितले की, एके दिवशी त्या व्यक्तीने महिलेकडे आईच्या उपचारासाठी पैसे मागितले. हळूहळू महिलेने त्याला 7,25,000 रुपये पाठवले आणि 15,42,688 रुपयांचे दागिनेही दिले. महिलेने सांगितले की, जेव्हा तिने पैसे परत मागितले तेव्हा त्या व्यक्तीने प्रतिसाद न दिल्याने तिने पोलिसांकडे संपर्क साधला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.