Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१६६ आरोपींवर ठाणे पोलिसांची एका रात्रीत कारवाई

arrest
, शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:15 IST)
संपूर्ण ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसह दहा गुन्हे अन्वेषण विभागांच्या पथकांनी गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी पहाटे १ या अवघ्या चार तासांच्या अवधीतच ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम राबविली. याद्वारे बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांसह १६६ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली.
 
ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशनुसार कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २९ डिसेंबर रोजी रात्री ते ३० डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील सर्व स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहा पथकांमधील २३४ अधिकारी आणि एक हजार ७० अंमलदार अशा एक हजार ३०४  कर्मचाºयांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ, मुंब्रा, कळवा आदी परिसरात राबविलेल्या कोंबिंग आॅपरेशनमध्ये  रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांची चौकशी करण्यात आली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

New Year पार्टीला जात असाल तर ह्या टिप्स नक्की वाचा