मुंबईत अनधिकृत पथ फेरीवाले आणि विक्रेत्यांमुळे नागरिकांना चालण्यासाठी मार्ग काढावा लागत असून जनतेला त्रास होत आहे. ही समस्या फार मोठी आहे. या वर काही तोडगा काढण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. या पथफेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
पथ फेरीवाल्यांमुळे इतर दुकानाचा मालकांना त्रास होऊ नये, जनतेला त्रास होऊ नये. या साठी कायदेशीर आणि वैध परवाने असणाऱ्या फेरीवाल्यांना कोणती अडचण नसावी.
उच्च न्यायालयाने शहरातील बेकायदा आणि अनधिकृत फेरीवाल्यांची समस्यांची दखल स्वतःहून घेतली होती.
न्यायालयाने सांगितले की, ज्या फेरीवाल्यांकडे परवाना आहे त्यांना पूर्ण सुरक्षा दिली पाहिजे.
बीएमसीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही फेरीवाल्याने दुकानी मांडू नये. या साठी सर्व वार्डांची दररोज तपासणी केली जाते. काही ठिकाणी फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.