मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांत रविवार दि. १७ ऑक्टोबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक कार्यान्वित करेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणारी डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल.
मेगाब्लॉक असलेल्या रेल्वे मार्गावरील वेळापत्रक
घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाऊन कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी /वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे /गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. असं रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.