Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात तीन महिला शिक्षकांनी केली महिला सहकाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल

ठाण्यात तीन महिला शिक्षकांनी केली महिला सहकाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल
, रविवार, 1 सप्टेंबर 2024 (16:46 IST)
ठाणे जिल्ह्यात तीन महिला शिक्षकांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकांनी दिन वेगळ्या बँकेतून 25  लाखांचे कर्ज घेतले.पीडितला सदर माहिती कळल्यावर त्याने पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली. 

आरोपी महिला शिक्षकांनी पीडितेच्या दस्तऐवजवरून बँकेतून 25  लाखाचे ऋण घेतले. नंतर कर्ज फेडले नाही. या प्रकरणाची तक्रार पीडित ने पोलिसांत केली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ठाण्यातील भिवंडी शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. एका महिला शिक्षकाने त्यांच्या सोबत काम करणाऱ्या एका महिला शिक्षकाने त्यांना बँकेतून ऋण घेण्याचे म्हटले. तिने मला फसवून माझे दस्तऐवज घेतले आणि एका बँकेतून 10 लाख रुपयांचे ऋण घेतले. नंतर लोनचे पैसे तिने स्वतः घेतले. हे प्रकरण 20 जुलै रोजीचे आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने 3 लाखरुपये फेडले मात्र उर्वरित रकम दिली नाही. 

नंतर रकम फेडण्याच्या बहाण्याने तिने माझ्याकडून आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेतले आणि एका दुसऱ्या बँकेतून माझ्या नावावर ऋण घेतले. या वेळी महिला शिक्षकाने 15 लाख रुपयांचे लोन घेतले. या प्रकरण दोन इतर महिला शिक्षिका साक्ष बनल्या.

या सर्व प्रकरणाची माहिती पीडित महिला शिक्षिकेला मिळाल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली असून तिघांवरही भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत फसवणूक, बनावटगिरी आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अद्याप या प्रकरणी अटक केली नाही.  पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे हत्या प्रकरण : बहिणीशी वाद झाल्यावर भाऊ -वहिनी ने केला निर्घृण खून, आरोपींना अटक