Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल सेवा विस्कळीत

मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल सेवा विस्कळीत
, शुक्रवार, 16 जुलै 2021 (14:35 IST)
मुंबई आणि कोकणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.त्यात मुंबईकरांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.कारण पुढच्या तीन तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या 4 तासांपासून पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
 
मुसळधार पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर पावसामुळे लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे मुंबईच्या लाईफलाईनला ब्रेक लागला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प आहे.
 
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.मुंबईचे अंधेरी सबवे,सायन गांधी मार्केट हिंद माता परिसर या सर्व परिसरात सध्या पाणी भरले आहे. अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे सबवेच्या खाली दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे सर्व वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्येसुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर,ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना 10 दिवसांपासून सतत उचक्या का येत आहे ?