मुंबईत लसीकरणाचा साठा संपल्याने पुढील तीन दिवस लसीकरण बंद असणार आहे. मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढले तीन दिवस लसीकरण बंद राहील. पुढले तीन दिवस लसीचा साठा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला लसीकरण करता येणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला लस उपलब्ध व्हावी. लस मिळाली तर आम्ही शॉर्ट नोटीसवर लोकांना कळवू आणि लसीकरण सुरू करु.
महापालिकेच्या लसीकरण केंद्राची संख्या वाढवणार आहोत. खाजगी कार्यालये, मोठ्या हौसिंग सोसायटी इथे आम्ही नवीन टप्याचे लसीकरण सुरू करणार आहोत. आपण टेस्टिंग तेव्हा वाढवले होते जेेव्हा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी बाजार, ट्रेन सगळं सुरू होती. आता या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनमुळे कमी झाल्या आहेत. आपण पॉझिटिव्ह लोकांचे सर्व जवळचे लोक टेस्टिंग करत आहोत असंही सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
आमच्या टीम प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी करते. त्यामुळे कोणाला कोणता बेड हवा आहे हे ठरवले जाते. आमच्याकडे ऑक्सिजन बेड आहेत. इतर बेड आहेत. आम्ही आयसीयू बेड वाढवत आहोत. आपल्याकडे 2800 आयसीयू बेड तयार झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं.