विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात आयसीयुत आग लागल्याने १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विजयवल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वेय निष्काळजीपणा आणि इतर व्यक्तींच्या जिवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रुग्णालयाचे नव्याने अग्निसुरक्षा लेखापरिक्षण, विद्युत सुरक्षा लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आले आहेत.