Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसईत घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

bandra west building collapsed
, बुधवार, 13 जुलै 2022 (23:52 IST)
सध्या राज्यात मुसळधार पावसाने रोद्र रूप धारण केला असून काही ठिकाणी पूरस्थिती झाली  असून हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.पावसामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्या मुंबई आणि त्याच्या जवळपास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातील वसईत राजीवली गावात वाघराळपाडा येथे अति मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर दरड कोसळली होती. या दुर्घटनेत सहा जण अडकले होते. वसई विरार अग्निशमन दलाने बचाव कार्य करत ४ जणांना सुखरूप बाहेर बाहेर काढले. पावसामुळे दरड कोसळून एका घरावर पडल्याने त्या दरडाच्या ढिगाऱ्याखाली दबून एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. 

अमित ठाकूर(35),रोशनी ठाकूर(14) हे दोघे मृत्युमुखी झाले असून वंदना अमित ठाकूर(33) आणि ओम अमित ठाकूर(10) हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या कुटुंबाच्या वारसांना शासनाच्या नियमा प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेला दिले आहेत 

एका चाळीतील घरावर सकाळी दरड कोसळली. यात दुर्घटनेत सहा जण ढिगार्‍याखाली अडकले होते. त्यातील ढिगार्‍यातून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघे मृत्युमुखी झाले.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र पाऊस : पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द