सिंधुदुर्गच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहे. या प्रकरणामुळे विरोधी पक्ष राज्य आणि केंद्र सरकारवर बेजबाबदारीचा आरोप लावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी करत आहे.
या प्रकरणात निषेध म्हणूंन काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाने जोडे मारो आंदोलन केले असून दक्षिण मुंबईतील हुतात्माचौकापासून हा मोर्चाचे गेटवे ऑफ इंडिया पर्यंत काढण्यात येत आहे.
या मोर्च्यात शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, शरद पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पाटोळे, पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सम्मिलीत होते. या वेळी मोर्चा काढताना घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सरकारच्या विरोधात टीका केली. गेटवे ऑफ इंडिया येथे एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागितली मात्र या मध्ये त्यांचा अहंकार दिसला. त्यांच्या माफीनाम्यात उद्धटपणा दिसत होता. त्यांनी माफी का मागितली आठ महिन्यांपूर्वी अनावरण केलेल्या पुतळ्यावर?.
माविआने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या शक्तीचा पराभव केला पाहिजे. पुतळा कोसळले हा महाराष्ट्राच्या देवाचा अपमान आहे.
या वर शरद पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले, सिंधुदुर्गात राजकोटच्या किल्ल्यावर पुतळा कोसळणे हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांचा हा अपमान आहे.
तर नाना पाटोळे म्हणाले, राज्यात होणाऱ्या निवडणुकीला लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी जनतेची जाहीर माफी मागितली आहे.