नवी मुंबई शहरात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका 13 वर्षाच्या मुलाने आपल्या मोठ्या बहिणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केले. वाशी पोलिसांनी सांगितले की, एका 13 वर्षीय मुलावर त्याच्या 15 वर्षांच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालक आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन वाशी सामान्य रुग्णालयात पोहोचले तेव्हा ही बाब उघडकीस आली. पोलिसांना दिलेल्या जबानीत पीडित मुलीने सांगितले की, तिने डिसेंबर महिन्यात तिच्या लहान भावासोबत पॉर्न पाहिला होता आणि त्यानंतर हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पीडितेच्या अल्पवयीन भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपासात गुंतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाऊ आणि बहिणीने पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. मात्र जानेवारीमध्ये मुलाने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. पीडितेने सांगितले की, तिने लहान भावाला तसे न करण्यास सांगितले, पण त्याने ऐकले नाही. पीडितेला पाळी न आल्याने तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.
बहिणीच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी त्या मुलावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार) आणि 376 (२) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला. POCSO कायद्याच्या कलम 4, 6 कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील कामावर गेले असताना ही घटना घडली. दोन्ही मुले पनवेल येथे आई-वडिलांसोबत राहतात. पीडितेचे आई-वडील घरकाम करतात. दोघेही जेमतेम 20,000 रुपये महिन्याला कमवू शकतात.
हे प्रकरण पनवेल येथील खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, बालकल्याण आयोग मुलाविरुद्ध पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे.