Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता कुठे गेली ताईगिरी? असा सवाल करत महापौरांची भाजपा महिला आमदारांवर सडकून टीका

आता कुठे गेली ताईगिरी? असा सवाल करत महापौरांची भाजपा महिला आमदारांवर सडकून टीका
, गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:25 IST)
मुंबई बोरिवलीतील भाजपा नगरसेविका कार्यालयात महिला कार्यकर्तीचा विनयभंग झाला.  याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रार करायला गेलेल्या महिलेवरचं भाजपा नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवलीतील भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.  याघटनेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच साकीनाका बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या भाजपा महिला आमदारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. तुमच्याच कार्यालयातील महिलेवर जेव्हा अत्याचार होते तेव्हा तुमची गुपचिळी का? आता कुठे गेली ताईगिरी? असा सवाल करत महापौरांनी भाजपा महिला आमदारांवर सडकून टीका केली आहे.
 
अंधेरी साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर  मुख्यमंत्र्यांनी लगेच वेळ न दवडता आदेश दिले. ज्या आरोपीला पकडले त्याच्यावर कारवाई तर होणारचं आहे. पोलिसांचा गस्त वाढवली. तरीपण भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मुख्य़मंत्र्यांना पत्र लिहिले आणि सांगितले. तुम्ही मुंबई बदनाम करणार… तुम्ही महाराष्ट्र बदनाम करणार.. मात्र अशा जेव्हा गोष्टी घडणार तेव्हा गुपचिळी राहणार…तेव्हा तोंड बंद करणार… तेव्हा ताईगिरी करणारा नाही… नको तिथे ताईगिरी करायला येणार…याचा अर्थ फक्त तुम्हाला महाराष्ट्र बदनाम करायला आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं आहे आणि मुंबईला बदनाम करायचं आहे. अशा जहरी टीका महापौरांनी केली आहे.
 
“मुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीने पाऊले उचलली आहेत आणि पुढेही उचलून ते करुन घेतील त्यावरतरी आपण विश्वास ठेवून राहिले पाहिजे. तिथेही तुम्ही राजकारण करणार? तिथेही तुम्ही पत्रबाजी करणार? आणि असं घडल्यानंतर पब्लिसिटी स्टंटसाठी पुढे येणार? आणि अशावेळेला तुमची गुपचिळी असणार. तुमच्याच कार्यालयातील महिलेवर जेव्हा अत्याचार होते तेव्हा तुमची गुपचिळी का?” असा परखड सवाल यांनी भाजपाच्या महिला आमदारांना केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का?