Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिव्यात आगीमुळे घर कोसळून महिलेचा मृत्यू

webdunia
, सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:31 IST)
दिवा येथील देसाई गावात वेताळ पाड्यात मोठे अग्निकांड झाले. या अग्निकांडात घर कोसळून घराची मालकीण सपना विनोद पाटील(40) यांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास घडली.विनोद पाटील यांच्या मालकीचे हे घर पडीक झाले होते या घराला आग लागली आणि घर कोसळले. त्यात दोघे जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे पथक कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तातडीनं आग विझवण्याचे काम केले. घराच्या ढिगाऱ्यात दबून सपना विनोद पाटील यांचा मृत्यू झाला. ही माहिती ठाणे महापालिका व्यवस्थापन विभागाने दिली.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio Phone Next ची बुकिंग सुरू, जिओच्या ग्राहकांची संख्या वाढू शकते