नरेंद्र मोदींची बीएची उत्तरपत्रिका १९७७ सालची आणि त्यांना पदवी १९७८ साली मिळाल्याचा आरोप केला. मोदींच्या उत्तरपत्रिकेवर नरेंद्रकुमार दामोदारदास मोदी असे नाव आहे तर, पदवीवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे नाव आहे. उत्तरपत्रिका आणि पदवीवरील नावात फेरफार कसा झाला असा सवाल विचारत आपने मोदींची डीग्री खोटी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींना वाचवण्यासाठी अमित शहा आणि अरुण जेटली यांनी देशाची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी केला. तसेच आपचा पत्रकारपरिषदेत हा आरोप लावण्यात आला आहे की नरेंद्र मोदी यांची खोटी पदवी दाखवून भाजपने देशाची फसवणूक केली आहे.