मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठा खांदेपालट केला आहे रात्री उशिरा सरकारने तब्बल ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावी काम केलेले तुकाराम मुंढे यांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. गडचिरोलीचे सध्याचे जिल्हाधिकारी रंजितकुमार हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. नवी मुंबईचे आयुक्त दिनेश वाघमारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये या पदावर असलेले राजीव जाधव हे आदिवासी विकास विभागाचे नवे आयुक्त असतील.
जलसंपदा विभागात नाखूश असलेले सतीश गवई यांच्याकडे पर्यावरण विभागाची धुरा देण्यात आली. वित्त विभागाची धुरा सांभाळत असलेले सुधीरकुमार श्रीवास्तव यांची परिवहन विभागात बदली झाली.मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांना एमएमआरडीएमध्ये पाठविण्यात आले आहे.