सिंहस्थ कुंभमेळ्यात शिप्रा नदीतल्या वाल्मिकी घाटावर भाजपचे अध्यक्ष अमित शाहांनी दलित सांधूसोबत स्नान केलं.
अमित शाहांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि अन्य नेत्यांनी स्नान केलं आहे. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी, जुना आखाडा पीठाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद आणि पीठाधीश्वर उमेशनाथही उपस्थित होते.या दलित साधूंसोबत अमित शाहांनी स्नान केल्यानंतर जेवणही केलं आहे. शिप्रा नदीत सरसंघचालक मोहन भागवतांनीही शिप्रा नदीत स्नान केलं आहे. त्यानंतर त्यांनी आदिवासींसोबत जेवण केलं.