Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली आता प्रदूषित शहर नाही : डब्लूएचओ

दिल्ली आता प्रदूषित शहर नाही : डब्लूएचओ
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतून बाहेर पडण्यात यश मिळाले असून ही बाब जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हवेच्या दर्जाबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
 
सध्या दिल्ली हे जगातील तीन हजार शहरांमधील हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत अकराव्या स्थानावर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी दिल्लीतील प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे. डब्ल्यूएचओने 2014 मध्ये 
 
जगभरातील 1600 शहरांचा अभ्यास केला होता. त्यावेळी दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत होती. यंदा 3000 शहरांचा अभ्यास करून त्याबाबतच्या आकडेवारीनुसार दिल्लीने सुधारणा केल्याचे आढळून आले 
 
आहे. डब्ल्यूएचओने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इराणमधील झाबोल हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.
 
आरोग्यावर होणार्‍या गंभीर परिणामांचा विचार करता ग्वाल्हेर आणि अलाहाबाद ही भारतातील दोन शहरे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आली आहेत. पाटणा आणि रायपूर अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर 
 
आहेत. जगातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांपैकी चार शहरे ही भारतातील असल्याचेही आढळून आले आहे. 2014 च्या आकडेवाडीनुसार जगातील टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे ही भारतातील होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगले दिवस येतील : पाक