Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींवर बोललो तर गडबड होईल : राजन

मोदींवर बोललो तर गडबड होईल : राजन
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही बोललो तर अडचण होईल. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही, असे स्पष्टपणे सांगत, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज पंतप्रधानांविषयीचा प्रश्न उडवून लावला.
 
पुढील महिन्यात गव्हर्नरपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या राजन यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच गव्हर्नरपदी मुदतवाढ न घेण्याची घोषणा केल्यापासून ठिकठिकाणी त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी राजकारण प्रवेशापासून ते त्यांच्या लोकप्रियतेविषयीच्या वैयक्तिक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. राजकारण प्रवेशाचा निर्णय माझ्या हातात नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राजकारण हा असा विषय आहे, ज्याबद्दल निर्णय घेताना मी पत्नीच्या पुढे जाऊ शकत नाही आणि सध्यातरी राजकारणाला माझ्या पत्नीचा नकार आहे, असे राजन यांनी सांगितले.

वयाच्या पन्नाशीनंतर भारतातील सर्वात लोकप्रिय पुरुषांच्या यादीत स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. २५ वर्षांचा असतानाच हे व्हायला हवे होते, असे राजन म्हणाले. राजन यांना रॉकस्टार बँकर असे काही लोक म्हणतात, त्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, ती अतिशयोक्ती असून प्रत्यक्षात मी अत्यंत निरस माणूस आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाड पूल दुर्घटना; दोन्ही बसचे सांगाडे सापडले