Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लव्हर म्हणून करत होते चॅट, भेटल्यावर निघाले पती-पत्नी

लव्हर म्हणून करत होते चॅट, भेटल्यावर निघाले पती-पत्नी
चंदीगड- ते प्रियकर आणि प्रेयसी म्हणून चॅट करत एकमेकाच्या प्रेमात पडले, पण खरं समोर आल्यावर दोघेही हैराण झाले. कारण डेटिंगवर एकमेकासमोर गेल्यावर ते पती-पत्नी निघाले आणि मग प्रकरण मारहाण आणि पोलिसांपर्यंत पोहचलं.
 
येथे लव-मॅरिज करूनही आपसात पटत नसलेल्या नवरा-बायकोने प्रेमाच्या शोधात सोशल मीडियाचा हात धरला. दोघांनी फेक आयडी बनवून चॅट करायला सुरुवात केली. पती सरकारी नोकरी आहे तर पत्नी आयटी फर्ममध्ये कार्यरत आहे.
 
पोलिसांप्रमाणे हे जोडपं मागील 15 दिवसापासून एकमेकाशी चॅट करत होतं. दोघांनी फेसबुकवर वेगळेच फोटो अपलोड केलेले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटण्याची वेळ ठरली. ते दोघं एकमेकाला शांतिकुंज पार्क येथे भेटायला पोहचले. एकमेकासमोर आले तर हैराण झाले आणि मारहाण सुरू झाली. पोलिसांना प्रकरण शांत करावे लागले.
 
मागील सहा महिन्यांपासून त्यांचे आपसात पटत नसून पत्नीने आपल्या पतीविरूद्ध तक्रारही नोंदवली होती. तेव्हापासून दोघेही वेग-वेगळे राहत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मच्छर पळवणारा TV आला, जाणून घ्या त्याची किंमत...