बिहारमधील समरसपूर गावाजवळ मुझफ्फरपूरमध्ये शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग 28 वर ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाल्यामुळे 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये एकूण 14 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी कामगार होते. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. तसेच अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. भारतात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशात रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. दरदिवशी राज्यात सरासरी 40 लोकांचा रस्ते अपघातात बळी जातो. या अपघातात एकूण मृतांच्या संख्येत 50 टक्के मृत्यू हे 20 ते 40 वयोगटातील तरूणांचे असतात.