Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोरबी पूल दुर्घटनेत राजकोटच्या खासदाराच्या कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

Mohan kundaria
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (11:00 IST)
गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत राजकोटचे खासदार मोहन कुंडारिया यांच्या 11 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.
 
मोहन कुंडारिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझ्या मेव्हण्याच्या भावाच्या चार मुली, तीन जावई आणि पाच मुलं. 11 मृतदेह मिळाले आहेत. एक बाकी आहे."
 
या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफसह इतर बचावकार्य पथकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
 
या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
 
पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरावतीमध्ये दोन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून पाच ठार, दोन जखमी