Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

91 वर्षाच्या म्हातारीसोबत 23 वर्षाच्या मुलाने केले लग्न, हनीमूनवर पत्नीचा मृत्यू

91 वर्षाच्या म्हातारीसोबत 23 वर्षाच्या मुलाने केले लग्न, हनीमूनवर पत्नीचा मृत्यू
हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक विचित्र बातमी ऐकून लोकं हैराण आहे. चर्चेचं कारण 23 वर्षाच्या तरुणाने 91 वर्षाच्या महिलेसोबत केलेलं लग्न.
 
अर्जेंटिनात हा विवाह सोहळा बघून सर्व हैराण होते परंतू त्यात भर पडली जेव्हा हनीमूनवर फिजिकल होताना पत्नीचा मृत्यू झाला. परंतू या प्रकरणामुळे मुलगा कायद्यात अडकू शकतो अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
 
या विचित्र लग्नामागे काही अटी होत्या. अर्जेंटीनातील हा 23 वर्षीय तरुण लॉ चा अभ्यास करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती परंतू अभ्यास करण्यासाठी काहीही करायची तयारी होती. त्याच्या घरात त्याची आई, भाऊ आणि एक 91 वर्षाची म्हातारी राहत होती.
 
त्या महिलेने मुलाला ऑफर दिली की तो तिच्यासोबत लग्नाला तयार असल्यास ती अभ्यासाचा खर्च उचलू शकते. तरुणाने होकार दिला आणि दोघांचे लग्न झाले. लग्नामागे एक कारण हे देखील असावे की महिलेच्या मृत्यूनंतर तिची पेन्शन तरुणाला मिळायला सुरू होईल कारण कायद्याने तो तिचा पती होता.
 
परंतू हनीमून दरम्यान बेडवरच प्राण सोडल्यानंतर जेव्हा पतीने पेन्शनसाठी आवेदन केले तर अधिकार्‍यांने संपत्तीच्या लोभात लग्न केल्याचा आरोप लावला. या प्रकरणात सध्या तरी तरुण तुरुंगात जाण्यापासून वाचलेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पती व्हेंटिलेटरवर, गर्भवती पत्नीने पाचव्या मजल्याहून उडी मारली, नंतर जुळ्यांना जन्म दिला