पती व्हेंटिलेटरवर, गर्भवती पत्नीने पाचव्या मजल्याहून उडी मारली, नंतर जुळ्यांना जन्म दिला

मध्यप्रदेशातील भोपाळ येथील कोलार भागात साईनाथ कॉलोनीत धक्कादायक घटना समोर आली. येथे गर्भवती पत्नीला वाटलं की पतीचा मृत्यू झाला म्हणून तिने पाचव्या मजल्याहून उडी मारली. नंतर तिला भरती करवण्यात आले. तेव्हा तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.
 
पोलिसाप्रमाणे सांईनाथ कॉलोनीमध्ये 38 वर्षीय मनोज गोहे याला ताप आल्यावर श्वास घेयला त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात भरती केले गेले. उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी आस सोडली. पती जिवंत राहणार नाही असे कळल्यावर गर्भवती पत्नीने 100 फूट दूर बांधकाम होत असलेल्या घराच्या गच्चीवरून उडी मारली. तिला लगेच भरती करण्यात आले. परंतू जुळ्यांना जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. परंतू डोळ्या उघडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
 
या घटनेच्या काही वेळानंतरच पतीचा मृत्यू झाला. अशा प्रकारे केवळ तीन तासात पूर्ण कुटुंब संपले

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते