मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतरही तत्कालिन यूपीए सरकारला सर्जिकल हल्ले करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सरकारने राजकारण करत सर्जिकल स्ट्राईक करणं टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी केला आहे.
सदरचा गौप्यस्फोट मेनन यांनी ‘चॉइसेस – इन्साईड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकात केला आहे. लोकभावनाचा आदर करत भारत सरकारने पाकमधल्या मुद्रिकेमध्ये असलेल्या लष्कर-ए- तैयबाच्या तळावर किंवा पाकव्याप्त काश्मिरमधे सर्जिकल स्ट्राईक केलेच पाहिजेत, असा सल्ला दिल्याचं मेनन यांनी म्हटले आहे.