Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली निवडणुकीदरम्यान 48 तस्करांना अटक, पोलिसांनी 12000 दारूच्या बाटल्या केल्या जप्त

arrest
, गुरूवार, 16 जानेवारी 2025 (10:23 IST)
Delhi news : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राजधानी दिल्लीत आतापर्यंत 48 जणांना दिल्ली उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. याशिवाय 12,000 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, दिल्ली उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत आतापर्यंत 48 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 12,000दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बुधवारी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, आम्ही दिल्ली उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत 4गुन्हे दाखल केले आहे, ज्यामध्ये 48 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि 12,000 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचे 11 गुन्हे दाखल केले ज्यामध्ये 12 जणांना अटक करण्यात आली आणि 8 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 11 चाकू जप्त करण्यात आले. त्यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या गैरवापराखाली 200गुन्हे दाखल करण्यात आले आणि 22.8 किलो चरस आणि 800 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नितीन गडकरी यांनी बॅरियर्स लेस टोलिंगवरील गोलमेज परिषदेला हजेरी लावली, टोलिंग बूथशी संबंधित समस्यांवर टाकला प्रकाश