उत्तर प्रदेशमधील गाझीपूरयेथून पक्का घाटात सोमवारी आपल्या कुटुंबियांसोबत आंघोळ करत असताना गंगा नदीत बुडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की घटनेच्या वेळी तिची मावशी मोबाईलने रील बनवत होती. ज्यामध्ये मुलीच्या बुडतानाचा व्हिडीओही रेकॉर्ड झाला होता, पण तिला समजले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत चिमुकलीचे कुटुंब छठपूजेसाठी घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते. दरम्यान मृत मुलीची मावशी रील बनावट होती. ही चिमुकली खोल पाण्यामध्ये गेली त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला याचा अंदाज तिच्या पालकांना देखील आला नाही की, आपली मुलगी पाण्यामध्ये बुडत आहे. काही वेळानंतर ती दिसली नाही त्यामुळे घाबरून सर्वांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळातच कुटुंबीयांमध्ये आरडाओरडा झाला. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेच्या दीड तासानंतर घटनास्थळापासून सुमारे 50 मीटर खालून या चिमुरडीचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तसेच पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या इच्छेनुसार पंचनामा करून चिमुकलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला .
Edited By- Dhanashri Naik