Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालत्या बसमध्ये बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका, वाचवले 48 प्रवाशांचे प्राण

heart attack women
, रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (17:39 IST)
ओडिशामध्ये फुलबनीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या बसच्या चालकाला चालत्या बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला, मात्र त्याने प्रसंगावधान दाखवत बस फिरवली आणि एका  भिंतीवर आदळली, त्यामुळे बस थांबली आणि बसमधील 48 प्रवाशांचे प्राण वाचले.

शुक्रवारी रात्री कंधमाल जिल्ह्यातील पाबुरिया गावाजवळ ही घटना घडली. सना प्रधान असे बसच्या चालकाचे नाव आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालवत असताना अचानक बस चालकाच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांनी याबाबत सांगितले, यावेळी त्याने एका भिंतीकडे स्टेअरिंग वळवले त्यामुळे बस तिच्यावर आदळली आणि थांबली आणि मोठा अपघात टळला. .
 
ही खासगी बस सहसा कंधमालमधील सरगढ ते उदयगिरी मार्गे भुवनेश्वरला जाते. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता.बस चालकाने प्रसंगावधान राखत बसला अपघातापासून वाचवत प्रवाशांचा जीव वाचवला.  
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ODI WC: इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूं हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले