Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाविकांच्या बसला भीषण आग, चार जणांचा मृत्यू, 22 प्रवासी होरपळले

भाविकांच्या बसला भीषण आग, चार जणांचा मृत्यू, 22 प्रवासी होरपळले
, शुक्रवार, 13 मे 2022 (19:42 IST)
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटराजवळ वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला शुक्रवारी आग लागून किमान चार जणांचा मृत्यू झाला.तर 22 जण होरपळले आहेत. वृत्तानुसार, कटरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नोमाईजवळ बसमधून मोठ्या संख्येने यात्रेकरू जम्मूला जात होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
कटरा हे प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी बेस कॅम्प आहे. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) मुकेश सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, प्राथमिक तपासात स्फोटकांचा वापर झाल्याचे समोर आले नसले तरी फॉरेन्सिक टीम आगीचे कारण तपासत आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार, कटराहून जम्मूकडे येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. आग बसच्या इंजिन पासून सुरु होऊन आगीने संपूर्ण बसला आपल्या वेढ्यात घेतले आणि  पाहता-पाहता बस आगीच्या भक्ष्यस्थानी झाली. प्रवासी गाडीतून बाहेर पडेपर्यंत संपूर्ण बस आगीने जळून खाक झाली होती. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 प्रवासी गंभीर भाजले. या सर्वांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन परतणारे भाविकही बसमध्ये असल्याची भीती व्यक्त होत आहे.
 
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या आत स्फोट झाल्यानंतर आग लागली. वृत्तानुसार, अनेक जण गंभीर भाजले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या घटनेत दहशतवादी असण्याची शक्यता नाकारली."एफएसएल टीम घटनास्थळी आहे," 
 
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, रुग्णांना सध्या जम्मूच्या नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डीसी रियासी बाबीला रकवाल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Price Today :एका आठवड्यात सोने 1,500 रुपयांनी स्वस्त, आजचे दर तपासा