Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार- ट्रक भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू

कार- ट्रक भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (09:36 IST)
अकोला- अकोला शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिधोरा येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या अपघातात अकोल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले. 
 
अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.  रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कार आणि ट्रक या दोन वाहनांची धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला आहे. 
 
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झाला. शेगावकडून एमएच 37 G 8262 ही कार वाशिमकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकं जोरदार होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले. जखमीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यात आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृतजण वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळापूर पोलीस घटनेची पुढील तपास करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज?; फडणवीसांचा प्रतिसवाल