Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायरस मिस्त्री कार अपघातप्रकरणी कार चालका विरोधात गुन्हा दाखल

cyrus
, शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (20:45 IST)
उद्योगपती सायरस मिस्त्री कार अपघातप्रकरणी अखेर कासा पोलीस ठाण्यात कार चालक महिला अनाहिता डरायस पंडोल ( वय ५५, रा. रज्जाब महेल, चर्चगेट, मुंबई) यांच्याविरोधात भादविस कलम ३०४ (अ), २७९,३३७,३३८ सह मोटार वाहन कायदा कलम ११२/१८३, १८४, मोटार वाहन चालक नियम १४,०५,०६/१७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोल गावच्या हद्दीतील सूर्या नदी पुलाच्या कठड्याजवळ मर्सिडीज बेँझ कारचा अपघात झाल होता. या भिषण अपघातात उद्योगपती सायर पालनजी मिस्त्री आणि डिनशा पंडोल यांचा मृत्यू झाला होता. तर अनाहिता डरायस पंडोल आणि डरायस पंडोल किरकोळ जखमी झाले होते.
 
या प्रकरणाची सखोल चौकशी  वसई प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मर्सडिज बेंझ इंडिया कंपनीकडून कारची तांत्रिक तपासणी करून अहवाल पोलिसांना देण्यात आला होता. तसेच चौकशीत कारचालक अनाहिता डरायस पंडोल यांनी कार हयगयीने आणि अविचाराने भरधाव वेगात चालवून धोकादायकरित्या ओव्हरटेक करताना सूर्या नदी पुलाच्या कठड्याला ठोकर मारल्याने अपघात झाल्याचे उजेडात आले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंथन मेळाव्यात शरद पवार यांचे चार मिनिट भाषण