Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

नवीन मोबाईलची पार्टी न दिल्याने मित्रांनी केला अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

murder
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (10:47 IST)
दिल्लीच्या शकरपूर मार्केट मध्ये अल्पवयीन मित्राची चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने नवीन मोबाईल घेतला होता.फोनची पार्टी न मिळाल्याने रागाच्या भरात त्याच्या मित्रांनी चाकूने भोसकून खून केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सचिन 16 वर्ष असे मृताचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सचिन हा इयत्ता नववीत शिकायचा. त्याने नवीन मोबाईल खरेदी केला होता. तो घेऊन घरी परत येताना त्याला त्याचे तीन मित्र भेटले आणि त्याच्या कडून मोबाईल ची पार्टी मागू लागले.

त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तिघा मित्रांनी त्याच्यावर चाकूने अनेक वार केले .त्याला जखमी अवस्थेत सोडून तिन्ही आरोपी पळून गेले. सचिन ला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
प्रकरणाची माहिती मिळाल्यावर शकरपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली असून आरोपी देखील अल्पवयीन आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ, नेत्यांनी प्रतिक्रिया दिली