मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आतिशी यांना मुख्यमंत्री पद दिल्यावर आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, दिल्लीसाठी आजचा दिवस खूपच दुःखद आहे.
आज दिल्लीची मुख्यमंत्री अशा महिलेला बनवण्यात आले आहे जिच्या कुटुंबीयांनी दहशतवादी अफजल गुरूला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. आतिशीच्या पालकांनी माननीय राष्ट्रपतींकडे अफजल गुरुची शिक्षा रद्द करण्यासाठी दयेचा अर्ज लिहिला. असा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे. त्यांच्या मतानुसार, अफजल गुरु निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात गोवण्यात आले.आतिशी मार्लेना या फक्त 'डमी सीएम' असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो!
आतिशी यांची आप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, दिल्लीचे मंत्री गोपाल राय म्हणाले की, आज दिल्ली आप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत आतिशी यांना पुढील दिल्ली निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकमताने देण्यात आली.
प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला ही जबाबदारी द्यावी लागली. दिल्लीचे मंत्री पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे केंद्रातील भाजप सरकार, संपूर्ण भाजप, देशाच्या पंतप्रधानांनी आम आदमी पार्टीला नष्ट करण्याचा कट रचला आणि एजन्सीचा गैरवापर केला. देशात जशी सरकारे पाडण्यात आली, तशीच दिल्ली सरकारलाही पाडण्याचा प्रयत्न झाला.आपच्या विरोधात कट रचत त्यांनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले. अरविंद केजरीवाल यांनी न घाबरता तुरुंगातून सरकार चालवले.