Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधार पॅन कार्डला जोडण्यासाठी नवी वेबसाईट

आधार पॅन कार्डला जोडण्यासाठी नवी वेबसाईट
, शुक्रवार, 12 मे 2017 (09:59 IST)
आयकर भरण्यासाठी यापुढे आधार ओळखपत्र पॅन कार्डला जोडणे अनिवार्य असणार आहे. यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर आधार ओळखपत्र पॅन कार्डला जोडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. आयकर विभागाने आधार ओळखपत्र पॅन कार्डला जोडण्यासाठी – https://incometaxindiaefiling.gov.in ही नवी वेबसाईट आयकर विभागाने सुरु केली आहे. त्यामुळे दोन ओळखपत्रांना जोडणे आता अधिक सोपे होणार आहे. 
 
या वेबसाईटवर जाऊन पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून त्यासोबत आधार ओळखपत्रावरील संपूर्ण नाव भरता येईल.  ‘यूआयडीएआयमधून (युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडिया) फेरतपासणी करण्यात आल्यानंतर दोन्ही ओळखपत्रे एकमेकांशी जोडण्यात येतील. जर आधार ओळखपत्रावरील नाव न जुळल्यास आधारचा ओटीपी (वन टाईम पासवर्ड) द्यावा लागेल,’ असे आयकर विभागाने म्हटले आहे. आधार ओळखपत्राचा ओटीपी संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांचा अपघात, 11 ठार