Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Adani Third Richest: गौतम अदानी बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकत जगातील तिसरे श्रीमंत बनले

gautam adani
, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (14:17 IST)
भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यासह त्याने आपला नवा विक्रम रचला आहे. त्यांनी लुई व्हिटॉनचे प्रमुख बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकले आहे. 
 
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हे स्थान मिळवणारे अदानी हे पहिले भारतीय आणि पहिले आशियाई आहेत. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, आता अदानी अमेरिकेतील आघाडीचे उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांच्या पुढे आहेत. अदानी हे आतापर्यंत आशियातील तसेच भारतातील सर्वात अधिक श्रीमंत होते. आता त्यांनी जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. 
 
बर्नार्ड अर्नॉल्ट हे LVMH Mot Hennessy Louis Vuitton चे सह-संस्थापक आहेत, सामान्यतः LVMH म्हणून ओळखले जाते. लक्झरी फॅशनच्या जगात LVMH हे जगातील आघाडीचे नाव आहे. अदानींनी श्रीमंतीच्या शर्यतीत देशातील मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अंबानी आणि चीनचे जॅक मा ही आशियातील आणखी दोन मोठी नावे आहेत, परंतु त्यांना अदानीप्रमाणे हे स्थान मिळवता आलेले नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेने शिवसेना-शिंदे गटाला दसऱ्याच्या मेळाव्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली