Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेने शिवसेना-शिंदे गटाला दसऱ्याच्या मेळाव्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली

maharashatra navnirman sena
, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (13:25 IST)
गेल्या दोन दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा शिंदे -ठाकरे गटाकडून केला जात आहे.शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
 
शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे  समजून घ्यावं असं म्हणत टोला लगावत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून दोन्ही गटाला सुनावले आहे . 
 
 
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" असं  ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.या ट्वीटसोबत त्यांनी राज ठाकरेंचा एक फोटो शेअर करत त्यावर “वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो” हे त्यांचं वाक्य देखील लिहिलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pakistan : पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पुरात बुडाला, पुरामुळे आतापर्यंत 1,136 लोकांचा मृत्यू