Publish Date: Sat, 11 Feb 2017 (15:38 IST)
Updated Date: Sat, 11 Feb 2017 (15:50 IST)
उघड्यावर शौचाला जाणा-यांची सवय बदलावी यासाठी अमिताभ बच्चन फोन करणार आहे. स्वच्छता मंत्रालयाकडून हे अभियान सुरु करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांना हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलं आहे, तिथे अजूनही कोणी उघड्यावर शौचाला जात आहे का ? हे पाहणं या अभियानाचा मुख्य उद्देश असणार आहे. या अभियानासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्री रेकॉर्डेड फोन कॉलची मदत घेतली जाणार आहे.पुढील आठवड्यात 10 दिवसांमध्ये एकूण 50 हजार लोकांना फोन करुन हा संदेश सुनावण्यात येण्याची मंत्रालयाची योजना आहे.