Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठ दिवसांची मुलगी जन्मदात्याआईने कोरड्या तलावात सोडली, भूक आणि तहानने मृत्यू

baby legs
, सोमवार, 24 जून 2024 (21:42 IST)
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथून क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या आठ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची घटना घडली आहे. 
 
महिलेने तिच्या मुलीला भर उन्हात जवळजवळ कोरड्या तलावात सोडले. त्यामुळे उष्मा, भूक, तहान यामुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही क्रूर घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
 
अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, रविवारी पोलिसांना माहिती मिळाली की सुंदरबनी तहसीलच्या कडमा प्राट गावात जवळपास कोरड्या तलावात एका अर्भकाचा मृतदेह पडून आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तातडीने तेथे रवाना झाले. तपासादरम्यान पीडितेची आईने  मुलीच्या वडिलांवर मुलीच्या मृत्यूचा आरोप केला. 

मुलीच्या आईचे मुलीच्या वडिलांशी भांडण झाले आणि तिला राग आला. पतीला  धडा शिकवण्यासाठी आईने आपल्या 8 दिवसांच्या मुलीला एका कोरड्या तलावात सोडले. मुलीचा उष्णता, भूक आणि तहान मुळे मृत्यू झाला.  
मुलीचे वडील घटनेच्या वेळी काश्मीरला गेले होते,पोलिसांचा संशय मुलीच्या आईवर आला आणि त्यांनी तिला चौकशीसाठी बोलावले त्यात तिने गुन्हा कबूल केला. या प्रकरणात मुलीच्या आईवर मुलीची हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर,हे नवीन नाव असू शकते