Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केजरीवाल आणि हजारे यांचे नाते सुधारणार ?

arvind kejariwal
, मंगळवार, 10 जुलै 2018 (09:21 IST)
दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता तसेच त्यांचे बंधू मनोज व सहकार्‍यांनी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राळेगणसिद्धीतील पाललोटक्षेत्र विकास, गबियन बंधारे, पाझर तलाव, शेततळी, मीडिया सेंटर, नापास मुलांची शाळा, पद्मावती परिसराची पाहणी केली. त्यानंतर हजारे यांची भेट घेतली. केजरीवाल व त्यांचे सहकारी तसेच अण्णा यांच्यात पर्यावरणाच्या र्‍हासाबाबत सखोल चर्चा झाली. पर्यावरणाच्या हानीमुळे नदीकाठच्या शहरांना निर्माण झालेला धोका, दिल्‍लीतील सध्याचे प्रदूषण, याचाही चर्चेदरम्यान उहापोह झाला. जगातील प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी उच्चशिक्षित तरूणांनी पुढे येण्याची गरज आहे, आयआयटीमध्ये शिकणार्‍या तरूणांकडून मोठी अशा असल्याचे हजारे म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानच्या हेरगिरीला चीनचे पाठबळ