पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक केली आहे. 'तो' भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; 'त्या' व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होताच. पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. तो भारतीय लष्कराच्या कोणत्या तुकड्या सीमाभागात तैनात असणार इथपासून लष्करामधील महत्त्वाच्या बैठका आणि तत्सम माहिती पाकिस्तानला पुरवायचा. तसेच त्याच्यावर आरोपांअतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेरगिरी आणि भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या महिला एजंटना द्यायचा. या प्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पाकमधील गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून असते. हेरांच्या दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा नेमकी कुठं तैनात करायची यासारखे निर्णयघेण्यात येतात.
गंगानगर जिल्ह्यातील सुरतगड आर्मी कँटमधून ताब्यात घेण्यात आलेल्या आनंदराज नावाच्या तरुणानं चौकशीदरम्यान ही सर्व माहिती उघड केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सूरतग सेना छावणीबाहेर गणवेशाचं दुकान चालवत असे. त्याने बहरोड़ भागात एका कारखान्यात काम सुरु केलं आणि हे दुकान बंद केले.
पाकिस्तानमधील तीन महिला एजंटच्या संपर्कात तो होता. या महिलांना तो गेल्या दोन वर्षापासून लष्कर, युद्ध क्षेत्र आणि तत्सम गोष्टींसंदर्भातील व्हिडीओ आणि फोटोंसह महत्त्वाची माहिती पुरवत असे. तसेच त्याने कँट परिसरातील वाहन दुरुस्ती करणाऱ्यांचे दूरध्वनी नंबर देखील त्यांना दिले होते. या महिला एजंट व्हिडीओ कॉलदरम्यान विवस्त्र होत असंत आणि आरोपी त्यांना ही माहिती देई. तो या महिलांचे व्हिडीओही रेकॉर्ड करत असे. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या अश्लील व्हिडीओ आणि फोटोंवरून ही बाब लक्षात आली.तसेच आरोपी या महिलांकडे माहितीच्या मोबदल्यात पैशांचीही मागणी करायचा बाब तपासातून समोर आली.
या अरोपीच्या संपर्कात असणाऱ्या तरुणीने जयपूर सैन्य रुग्णालयात अधिकारी असल्याचं सांगत अरोपीशी संपर्क साधला. जयपूरला बोलवून लग्नाचं आमिष दाखवत त्याला माघारी पाठवलं. आनंदराजची ओळख करून देत तरुणीने ती विद्यार्थीनी असल्याचं खोटं सांगितलं. तर बिकानेर आर्मी परिसरातील उपहारगृहा चालवणाऱ्या विक्रम सिंहला दुसऱ्या तरुणे जाळ्यात अडकवलं. व हीच तरुणी आनंदराजच्याही संपर्कात होती.
हा आरोपी आनंदराज या तीन पाकिस्तानी महिला एजंच्या संपर्कात असून त्यांच्याशी तो अश्लील संवाद साधायचा. तो संवेदनशील माहिती या मोबदल्यात पाकिस्तानला पुरवत होता. सध्या भारतीय लष्करासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती अरोपीकडून पाकपर्यंत पोहोचल्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे. तसेच आता या प्रकरणात उच्चस्तरिय अधिकारीसुद्धा लक्ष घालताना दिसत आहेत.
Published By- Dhanashri Naik