Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसाम : दोनपेक्षा अधिक अपत्ये, मग सरकारी नोकरी नाही

आसाम :  दोनपेक्षा अधिक अपत्ये, मग सरकारी नोकरी नाही
, मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (16:59 IST)

आसाम सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा मंजूर केला आहे. या नव्या कायद्यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार आहे. यासोबतच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. आसामच्या विधानसभेत मोठ्या वादळी चर्चेनंतर या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. सरकारी नोकरीच्या नियमांमध्ये लवकरच नव्या कायद्यानुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन