गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मद्यपान करुन अनेकदा लोक गोंधळ घालत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर गोव्यात बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी अबकारी नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील, असे पर्रिकरांनी सांगितले.
‘सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर बंदी आणण्यासाठी अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. ही अधिसूचना ऑक्टोबरमध्ये काढण्यात येईल. त्यासाठी आम्हाला सध्याच्या नियमांमध्ये बदल करावा लागेल,’ असे पर्रिकर यांनी सांगितले आहे.