Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसाममध्ये गोळीबारात 2 ठार,9 पोलिसांसह अनेक जखमी,सरकार ने न्यायायलयीन चौकशीचे आदेश दिले

आसाममध्ये गोळीबारात 2 ठार,9 पोलिसांसह अनेक जखमी,सरकार ने न्यायायलयीन चौकशीचे आदेश दिले
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (10:35 IST)
आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुटी भागात सिपाझार येथे गुरुवारी स्थानिक आणि पोलिसांमध्ये अतिक्रमणांना हुसकावून लावण्याचा प्रयत्नांत हिंसक चकमकी झाल्या. या चकमकीत किमान दोन आंदोलक ठार झाले आणि नऊ पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे.एकूण 20 लोक जखमी झाले.

अहवालानुसार, सुरक्षा प्रकल्पाचे एक पथक कृषी प्रकल्पाशी संबंधित जमिनीवरून बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी गेले तेव्हा स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली.या चकमकीत किमान दोन जण ठार झाले असून नऊ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत.या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे,ज्यात छातीवर गोळी लागलेल्या व्यक्तीला कॅमेरा घेतलेला एक व्यक्ती मारहाण करताना दिसत आहे. या घटनेवरील वाढता जनक्षोभ पाहता राज्य सरकारने घटनेच्या परिस्थितीची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. गृह आणि राजकीय विभागाचे सचिव यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार या घटनेची चौकशी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पोलीस कारवाईला राज्य सरकारने ठरवून केलेले   गोळीबार म्हटले आहे.  
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही काळापूर्वी आसाम मंत्रिमंडळाने अतिक्रमण करणाऱ्यांकडून जमीन पूर्णपणे वसूल करण्याचा आणि राज्य कृषी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.
 
सुमारे 800 कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी करत सार्वजनिक निदर्शने झाली, ज्यांचा दावा आहे की त्यांना अनेक दशकांपासून राहत असलेल्या भूमीतून बेदखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक,दरांग यांनी दावा केला की, आंदोलकांनी पोलीस आणि इतरांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि दगडफेकही केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महागाईचा भडका :एलपीजी सिलेंडर 1000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते, तेलाच्या किमतीतही वाढ