Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य प्रदेश साहित्य संस्कृती मंचच्यावतीने पुरस्कार जाहीर

anil dhadvaiwale
, शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (22:07 IST)
जळगावात शनिवारी होणार पुरस्काराचे वितरण
साहित्य संस्कृती मंच मध्यप्रदेश यांच्यावतीने मराठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यात जळगावचे रंगकर्मी शंभू पाटील यांना पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार त्यांच्या नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल देण्यात येणार आहे. यासोबतच डॉ. उमा कंपुवाले यांना कवयित्री डॉ. सुशीलाबेन शहा हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंदोरचे अनिल धडाईवाले यांना सोपानदेव चौधरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर अश्‍विन खरे यांना पूज्य साने गुरुजी पुरस्कार तर सातारा येथील शिरीष चिटणीस यांना कवी भा. रा. तांबे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शनिवारी, २५ रोजी उद्घाटन समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
 
साहित्य संस्कृती मंच मध्य प्रदेश यांच्यावतीने दोन दिवसाचे साहित्य संमेलन जळगाव येथे आयोजित केलेले आहे. २५ व २६ नोव्हेंबर रोजी हे साहित्य संमेलन जैन हिल्स येथे होणार आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून साधारण दीडशे साहित्यिक रसिक संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने होणार हे साहित्य संमेलन दोन भाषा आणि दोन प्रांत यांच्या संस्कृती व साहित्याला जोडणार आहे. हा हेतू लक्षात घेऊन आयोजकांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
 
संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, कवी अरुण म्हात्रे, कवी अशोक नायगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. जळगावकर साहित्य रसिकांनी संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्य सांस्कृतिक कला मंचाच्या पूर्णिमा हुंडीवाले, ॲड.सुशील अत्रे, डॉ. श्रीकांत तारे, प्रा. संजय दहाड यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्री छगन भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेला भाजपा नेते पडळकरांचे समर्थन